Skip to main content
Skip to navigation
Screen reader access
 
Text Size :     A-     A     A+    
English     मराठी

बातमीचा तपशील

   बातमी  /  बातमीचा तपशील

06 Aug - 2026

फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे आणि महाराष्ट्र शासनाचे भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय यांच्यातील सामंजस्य करार


पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय आणि महाराष्ट्र शासनाचे भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय यांच्यात प्रथमच ऐतिहासिक सामंजस्य करार

४ ऑगस्ट २०२६: विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शैक्षणिक, संशोधन आणि उद्योग-अभिमुख संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाचे भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय आणि पुण्यातील ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला.

हा करार भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाचे उपसंचालक (प्रादेशिक कार्यालय – छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभाग) डॉ. सुयोग जगताप, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. आनंद पाटील आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांच्या उपस्थितीत; तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि पदाधिकारी यांच्या समवेत करण्यात आला.

या महत्त्वपूर्ण सहयोगामुळे विद्यार्थ्यांना भूविज्ञान, खनिज संसाधन व्यवस्थापन, संशोधन, व्यावसायिक प्रशिक्षण, क्षेत्रीय भेटी (field visits), तांत्रिक मार्गदर्शन आणि विविध उद्योग-अभिमुख उपक्रमांमध्ये संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभवाशी प्रभावी सांगड घालून विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करणे हे याचे उद्दिष्ट आहे.

विशेष म्हणजे, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या इतिहासातील एखाद्या शैक्षणिक संस्थेसोबतचा हा पहिलाच सामंजस्य करार आहे; त्यामुळे शासन आणि शैक्षणिक क्षेत्र यांच्यातील सहयोगाच्या दृष्टीने हा एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

अशा भागीदारीमुळे संशोधन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उच्च कौशल्यप्राप्त मनुष्यबळाचा विकास बळकट होईल, तसेच आगामी काळात पर्यावरणीय शाश्वतीला चालना देणारे उपक्रम अधिक प्रभावी होतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

Developed by CsTech - © DGM, Nagpur

Last Updated 07/08/2026, Visitor: 18581158